Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
केशायुर्वेद-रुग्ण संवाद वाढावा

    घरातील वातावरण सुशिक्षित. आई गृहिणी, वडील महावितरणमध्ये अभियंता, भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर, तर बहिण वेब डिझायनर. शिक्षणाला पूरक वातावरण घरात असल्याने डॉ. सोनाली कवठेकर यांना आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुण्यातील हडपसर येथील सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचे शिक्षण घेत डॉ. सोनाली कवठेकर वैद्यक सेवेकडे आपला मोर्चा वळवला. पण आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी 2010 मध्ये जुईनगर, नवी मुंबई येथे आयुर्वेद व पंचकर्माची प्रॅक्टिस सुरू केली. सद्गुरू कृपेने अगदी सुरुवातीपासूनच क्लिनिकला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांचे अध्यात्मिक गुरु आदरणीय श्री दादा महाराज सांगवडेकर व आदरणीय श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात समीर जमदग्नी, अनिल बनसोडे, अजित राव व वैभव मेहता हे त्यांचे गुरु. त्यांच्याच आशीर्वाद व मार्गदर्शनाने त्यांची वाटचाल सुरु आहे.
    आयुर्वेदाविषयी बोलताना डॉ. सोनाली म्हणतात, हे एक शाश्वत सत्य आहे. आयुर्वेद समजून घेत असताना नवनवीन ज्ञान मिळाले. बर्‍याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. या गोष्टींचे संवर्धन करून त्याचा योग्य ठिकाणी उपयोग व्हायला हवा, असे नेहमी वाटायचे. शिक्षण घेत असताना जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ऍलोपॅथीचे ज्ञान जास्त होते. नंतर गुरूंच्या संपर्कात आल्यानंतर आयुर्वेदाची महती कळली व त्यानंतर आयुर्वेदाला अधिक प्रभावीपणे जाणून घेण्यासाठी सखोल अभ्यास सुरु केला.
    वैद्य हरीश पाटणकर हे माझे परम मित्र. आयुर्वेद क्षेत्रामध्ये त्यांचे उत्तम कार्य सुरु आहे. वैद्य पाटणकर यांच्याशी ओळख असल्याने एकंदरीतच त्यांच्या कामाविषयी आधीपासूनच माहिती होती. त्यांच्या कामावर विश्वासही होता. त्यामुळे त्यांच्या केशायुर्वेद या संकल्पनेशी मी सुरवातीपासूनच जोडली गेली आहे. त्यामुळे केशायुर्वेदला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद व त्याबाबत लोकांमध्ये वाढणारा विश्वास पाहता यात आपणही सहभागी व्हायला हवे, असा विचार मनामध्ये आला व या प्रभावी संकल्पनेसोबत 23 मार्च 2017 पासून कार्य करण्यास सुरुवात केली.
    आयुर्वेदात निर्माण झालेली आवड जोपासण्यासाठी व आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद, स्टुडंट्स व डॉक्टर्स या संस्थेसोबत मी काम करत आहे. या संस्थेच्या नवी मुंबई याठिकाणी अध्यक्ष या पदावर मी सध्या कार्यरत आहे. आम्ही स्वतः या संस्थेमार्फत सतत विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्याने व शिबिरांचे आयोजन करत असतो. या शिबिरांमधून आयुर्वेदाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असतो. नुकताच 5 मे रोजी दादरमध्ये नेत्रदीपक असा नॅशनल सेमिनार झाला. या सेमिनारला उत्कृष्ट प्रतिसादही मिळाला.
    केशायुर्वेदसोबत काम करत असताना माझ्या करिअरमध्ये महत्वपूर्ण बदल घडून आले आहेत. केशायुर्वेदासाठी लोकांकडून मिळणारा प्रतिसाद व रुग्णाची वाढणारी संख्या यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक काम करण्याची इच्छा निर्माण झाली. एकंदरीत केशायुर्वेदसोबत काम केल्यानंतर आमच्या व्यवसायाबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. एका रुग्णाच्या मनामध्ये वैद्याविषयी असणारा विश्वास हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे त्या नमूद करतात.
    केशायुर्वेद ही एक प्रभावी संकल्पना आहे. क्लिनिकमध्ये काही गंभीर समस्या असणारे रुग्ण आल्यास त्यांचे हेअर सॅम्पल्स केशायुर्वेदमध्ये पाठविण्याचा प्रयत्न करत असते. परंतु केशायुर्वेदबाबत योग्य माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी व केशायुर्वेदची गुणवत्ता वाढविण्यासाठी अचूक प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे. यासाठी मी माझ्या पातळीवर नेहमी काम करत आहे. यासाठी वर्तमानपत्रे, जाहिरात यांसारख्या प्रभावी माध्यमांचा आपण वापर करायला हवा. टेलिव्हिजनवर सातत्याने होणार्‍या टॉक शोजमध्ये सहभागी होऊन केशायुर्वेदबाबत जनजागृती निर्माण करायला हवी. केशायुर्वेदला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते. माझ्या क्लिनिकच्या आसपासच्या भागामध्ये पॅम्प्लेट्स, फ्लेक्स आदींच्या माध्यमातून केशायुर्वेदला जनसामान्यांत पोहचविण्याचा माझा मानस आहे. तसेच क्लिनिकच्या बाहेर केशायुर्वेदबाबत माहिती देणारा फलकही ठळकपणे लावला आहे. क्लिनिकमध्ये येणार्‍या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करते. केशायुर्वेदची वाटचाल पाहता भविष्यात ही उपचार पद्धती एका वेगळ्या उंचीवर गेलेली पाहायला मिळणार आहे. परंतु एक खंत अजूनही वाटते, ती म्हणजे आजही केशायुर्वेदची जाहिरात करावी लागते. रुग्ण केशायुर्वेदपर्यंत नाही, तर केशायुर्वेदला रुग्णापर्यन्त पोहचावे लागते. केशायुर्वेदला तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.
    आपल्या देशाला आयुर्वेदाची मोठी परंपरा लाभली आहे आणि म्हणूनच आयुर्वेद व योग क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. या क्षेत्रात कार्यरत असताना आयुर्वेद व्यासपीठातर्फे मधुमेह या विषयावर आयोजित व्याख्यानासाठी तसेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद स्टुडंट्स व डॉक्टर्सतर्फे आयोजित नॅशनल सेमिनारमध्ये उत्कृष्ट नियोजनासाठी सन्मानित करण्यात आले. वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पेपरची निवड झाली.  तसेच आयुर्वेदात काम करत असताना लोकांकडून मिळत असणारा प्रतिसाद यातून हेच खरे माझ्यासाठी पुरस्कार आहेत. यातूनच पुन्हा नव्याने काम करण्याची उर्मी मला मिळते.